\Niyati\
Page 20
नियती
ऋतू वसंत बहरवी फुले
शिशीर ऋतूत झडती पाने
पतझड पुनर्पालवी मध्ये
धरती गोमटी रसाळ फळे
चमत्कार निसर्गी दिसे
तोची मानवी जीवनी असे
जन्म जरा मरणाच्यामध्ये
जन्मती गोजिरी खुशाल मुले
ईश्वरी किमया गूढ किती
निर्मिती तेथे क्षती निश्चिती
जरी नियम काटेकोर अती
ठरवी मानवच अपुली नियती
-
नारायण
०७/०२/०९
Free Download
Page 20
\Niyati\
|